Home क्राईम घरफोडी प्रकरणी दोन आरोपी अटकेत ; ७० हजारांची रोकड व मोटारसायकल जप्त

घरफोडी प्रकरणी दोन आरोपी अटकेत ; ७० हजारांची रोकड व मोटारसायकल जप्त

0
14


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत जामनेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली ७० हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत केली आहे. याशिवाय गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून, पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा २४ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला असून, त्याच दिवशी रात्री ९.५९ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरातून ७० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरिफखान लालखान कंजर (वय २५, रा. सोनारी, ता. जामनेर, जि. जळगाव) आणि मुबारिक अली खान (वय २०, रा. केरपाणी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई आरोपींना अटक करताना पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे (तपासी अंमलदार) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल जाधव यांनी मोलाची मदत केली.


Protected Content

Play sound