पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे ट्विटर अकाउंट हॅक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तीक वेबसाईटचे ट्विटर आज पहाटे अकाऊंट हॅक करण्यात आले असून हॅकरने बीटकॉईनच्या स्वरूपात पैशांची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइट आणि नरेंद्र मोदी मोबाइल अ‍ॅपचे ट्विटर अकाउंट गुरुवारी पहाटे ३:३० वाजता हॅक झाल्याची माहिती आहे. खात्यात अडीच दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हे ट्विटर खाते जॉन विक यांनी नावाच्या हॅकरने हॅक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याने याबाबतचे ट्विट करून ते थोड्या वेळानंतर डिलीट केले. दरम्यान, संबंधीत अकाऊंट हॅक करून त्या हॅकरने ट्वीटच्या मालिकेद्वारे अनुयायांना क्रिप्टोकरन्सीद्वारे पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडामध्ये दान करण्यास सांगितले.

या प्रकाराची ट्विटरने दखल घेतली आहे. आपला मंच हा सुरक्षित असून हा प्रकार नेमका कसा झाला याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ट्विटरतर्फे जाहीर करण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली असून सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात अनेक ख्यातनाम व्यक्तीमत्वांची खाती हॅक झाली होती. याच अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि अब्जाधीश व्यवसायिक एलोन मस्क यांच्यासह वेबसाइटच्या काही प्रमुख प्रोफाइल हायजॅक करण्यासाठी हॅकर्सनी ट्विटरच्या अंतर्गत प्रणालींमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांचा वापर डिजिटल चलनासाठी केला होता. या पाठोपाठ आता मोदींच्या पर्सनल वेबसाईटचे अकाऊंट हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: