ज्यूक्टो संघटनेचे पदाधिकारी देणार जिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । राज्य महासंघाच्या आदेशानुसार ज्यूक्टो संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील तहसिलादर यांना सनदशिर मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून मोजक्या संख्येने येत्या (दि.४ सप्टेंबर) रोजी निवेदन सादर करणार आहेत.

पत्रकात म्हटल्यानुसार, तालुकास्तरावर तालुक्यातील पदाधिकान्यांनी इतर पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन द्यावयाचे आहे. गेल्या वीस वर्षात राज्य सरकारने वेळोवेळी आश्वासन देचूनही कनिष्ठ प्राध्यापकांच्या प्रमुख समस्या सोडविल्या नाहीत, अनेकवेळा राज्याच्या पदाधिकान्यांशी चर्चा करून केवळ आश्वासने दिलीत. घोषणा करूनही राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिका-यांची वेळोवळी मिटींग घेवून खालील प्रमुख मागण्या सोडविल्या नाही. म्हणून कोरोना काळातही संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत असून येत्या (दि.५ सप्टेंबर) रोजी शिक्षक दिनावर बहिष्कार म्हणून काळ्याफिती लावणार आहेत.

प्रमुख मागण्या :-
१) मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित क.महाविदयालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे. केवळ घोषित यादीचा विचार न करता घोषित यादीतील शिक्षकांना देखिल हे अनुदान देण्यात यावे.
२) दशकाहून अधिक काळ २००२-२००३ पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखिल पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.
३) आय.टी.विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे. आय.टी.चे शिक्षक गेल्या १० वर्षापासून विनावेतन काम करीत आहेत.
४) सर्व कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी.
५) शासकिय कर्मचा-यांना १०,२०.३० वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी.

वरील मागण्यांच्या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील साऱ्या कनिष्ठ प्राध्यापकांनी एकजूट करुन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन ज्यूक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. शैलेस राणे, सचिव प्रा. नंदन बळींकर, प्रा. सुनिल गरुड, कार्याध्यक्ष प्रा. सुनिल पाटील, प्रा. सुनिल सोनार व सर्व जिल्ह्याधिकारी यांनी ज्यूक्टो सभासदांना केले आहे.

Protected Content