Home क्राईम हद्दपार असतांना शहरात फिरणार्‍या तरुणाला अटक

हद्दपार असतांना शहरात फिरणार्‍या तरुणाला अटक

0
50


जळगाव प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  जळगाव तालुक्यातून हद्दपार केले असतानाही जळगाव शहरात फिरणार्‍या तरूणाला रविवार १९ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईश्वर कॉलनी येथील ललित ऊर्फ सोनू गणेश चौधरी  वय २८  यास  १० सप्टेंबर  ते २० सप्टेंबर दरम्यान जळगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. असे असतानाही ललित हा  रविवारी ईश्वर कॉलनीत विना मास्क फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.  त्यानुसार शिकारे यांनी  सहायक फौजदार अतुल वंजारी अनिल सिंग पाटील सुधीर साबळे इम्रान सय्यद गोविंदा पाटील सचिन पाटील यांच्या पथकास सूचना केल्या. पथकाने  ईश्वर कॉलनी येथे विना मास फिरत असलेल्या ललित ऊर्फ सोनू यास अटक केली. पोलिस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून ललित ऊर्फ सोनू याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

 


Protected Content

Play sound