क्षयरोग रुग्णांसाठी निर्मिती फाऊंडेशन सरसावले !

IMG 20190325 WA0027

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील गरजू क्षयरोग रुग्णांना दरमहा लागणाऱ्या सकस आहार, सक्षम प्रवाह उपक्रमाला निर्मिती फाऊंडेशनने हातभार लावला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सपके यांनी वाढदिवस साजरा न करता जागतिक क्षयरोग निवारण दिनाचे औचित्य साधून प्रोटिन्स डबे वितरीत केले.

 

जिल्हा क्षयरोग निवारण विभाग आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेतर्फे जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सकस आहार, सक्षम प्रवाह उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमात गरजू रुग्णांना दरमहा सकस आहार पुरविण्यात येतो. निर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सपके यांनी वाढदिवस साजरा न करता क्षयरोग रुग्णांना साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला. जागतिक क्षयरोग दिनी एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांच्याकडे नितीन सपके यांनी प्रोटिन्सचे डब्बे स्वाधीन केले. यावेळी नितीन सपके यांनी सांगितले की, समाजसेवेतून समाधान मिळते आणि समाधानातून आत्मिक शांती मिळते. दरवर्षी वाढदिवसाच्या होणाऱ्या खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांना निर्मिती फाऊंडेशनतर्फे प्राधान्य देण्यात येईल, तसेच जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी इतरांना देखील प्रोत्साहित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी निर्मिती फाऊंडेशनचे यादवराव बऱ्हाटे, बाळासाहेब सुर्वे, रमेश चौधरी, उमेश गवळी, मिलींद चौधरी, धनराज चौधरी, अनिल गवळी, मनोज चौधरी, सागर सोनवणे, बाळू पाटील, सचिन भोळे, अनुप पाटील, महेश माळी, गौरव चौधरी, अमोल सोले, वैभव धर्माधिकारी, विनय जोशी आदींसह फाऊंडेशनचे सहकारी व मित्र परिवार उपस्थित होता. वर्षभरात कमीत कमी १०० क्षयरोग रुग्ण दत्तक घेत त्यांना मदत करण्याचा मानस फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन संजय बाविस्कर यांनी केले.

Add Comment

Protected Content