सहकाऱ्याने कार्यालयात वायूप्रदूषण करून छळल्याचाआरोप करून १२.५ कोटीच्या भरपाईची मागणी

 

 

slim clipart 18

 

मेलबर्न (वृत्तसंस्था) कार्यालयातील सहकाऱ्याने सतत वायू प्रदूषण करून वैताग आणल्याने त्रस्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या माजी कंपनी ओनरकडे चक्क साडेबारा कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. कंपनीतील एका सहकाऱ्याच्या या घाण सवयीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागल्याने आपणास १.८ मिलियन डॉलरची (१२.४ कोटी रुपये) भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील या इंजिनियरनं केली आहे. यासाठी त्याने न्यायालयात खटलाही दाखल केला आहे.

कंपनीत काम करीत असताना एक माजी सहकारी वारंवार माझ्याजवळ येऊन वायू प्रदूषण करायचा, कित्येक महिने मी त्याचा त्रास सहन केला. त्यामुळे मला भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी या इंजिनियरने कंपनीकडे केली आहे. डेव्हिड हिंगेस्ट असे त्याचे नाव आहे अन त्याचा हा सहकारी आहे ग्रेग शॉर्ट. मात्र त्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला असून त्यासाठी छळवणूक झाल्याचा कोणताही पुरावा या प्रकरणात दिसत नाही, असा तर्क न्यायाधीशांनी दिला आहे.

Add Comment

Protected Content