जागतिक महिला दिनी महिलांना `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित

चाळीसगाव प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांनी त्यांच्या क्षेत्रात जोमाने काम करावे या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आज (दि.८ मार्च) रोजी १८ महिलांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.             

जागतिक महिला दिन हा जगभर उत्साहात साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी ह्या दिवसाचा मुख्य उद्दिष्ट असतो. या दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे संस्थापक अशोक राठोड यांनी आज आठरा महिलांना त्यांच्या घरी जाऊन नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कार्यक्रम आयोजित न करता घरी जाऊन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा. सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या महिलांना सन्मानित करण्यात आल्या त्यापुढील प्रमाणे. संस्थापिका संपदा उन्मेष पाटील ( उमंग महिला परिवार), संस्थापिका प्रतिभा मंगेश चव्हाण ( शिवनेरी फाऊंडेशन), डॉ. शुभांगी सत्यजित पूर्णपात्रे (संचालक संगम हॉस्पिटल), संस्थापिका मीनाक्षी राजाराम निकम

(स्वयंदीप सेवा प्रकल्प), सुनीता सुनील घाटे (नाट्य विधा प्रमुख देवगिरी प्रांत संस्कार भारती), संचालक तन्वी कौस्तुभ पाटील (पाटील हॉस्पिटल), संस्थापिका  मनीषा प्रकाश पाटील (जिजाऊ महिला मंडळ), कनिष्ठ सहा. सुनंदा ठाणसिंग चव्हाण ( पंचायत समिती- चाळीसगाव),  मिताली सुधाकर बच्छाव (महिला ग्रामीण पोलीस- चाळीसगाव), अनिता यशवंत सुरवाडे (महिला ग्रामीण पोलीस- चाळीसगाव), ऍड. कविता वाल्मिक जाधव (सचिव वकील संघ- चाळीसगाव ), सरपंच कविता सतीश महाजन (टाकळी प्र चा), सरपंच पुष्पा जगन पवार ( ओढरे), संचालक निर्मला राजेंद्र चौधरी ( गायत्री साडी सेंटर), तनुजा योगेश उगले (महिला रिक्षाचालक) व उषा शिवाजी दहीहंडे (गृहिणी), राधा मधुकर जाधव (गृहीनी) व स्टॅम्प वेंडर सविता अशोक देशमुख आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.

 

Protected Content