म्हसावद येथे ऑनलाईन पद्धतीने जागतिक महिला दिन हर्षोल्हासात

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात आज जागतिक महिला दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाला व्याख्याता प्रा.डॉ.प्रेमला रमेश मुखेडकर(सहा.प्रा.मराठी विभाग.प्रा.डॉ.ई.भा. पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद) यांनी स्त्रियांची सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले,डॉ.प्रेमला ताईंनी समाजातील मानसिकतेवर प्रकाश टाकतांना स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यात यावे तिचे विचारांचा व मतांचा आदर करण्यात यावा, स्त्रियांनी स्वतःला कमी लेखू नये,आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीला समोरे जावे,मुलींनी शिक्षणाला महत्त्व द्यावे. 

आपला नोकरी,उद्योग,व्यवसायाचा मार्ग स्वहिमतीने निवडावा असे बळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ताईंनी आजच्या कार्यक्रमात आपल्या बोलण्यातून दिले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रुती पाटील मँडम, व डॉ.प्रेमला ताईंचा परिचय सौ.प्रतिभा चव्हाण यांनी तर आभार अमोल चौधरी सर यांनी मानले सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पी.डी.पाटील , शिरीष सोनार सर, उपमुख्याध्यापक डी.एस.खोडपे सर,पर्यवेक्षक आर.व्हि.पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्यू.कॉलेजचे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मेहनत घेतली.

Protected Content