विवाह खर्च बचतीतून दिला सामाजिक कार्यास निधी

अमळनेर (प्रतिनिधी) विवाह सोहळा म्हटला की, हजारो रूपयांची उधळण होते. अगदी पैसे नसले तरी उसनवारी घेऊन लग्न सोहळा हा धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु रविवारी अमळनेर शहरातील बिऱ्हाडे परिवाराने ‘बामसेफ’ संघटनेला दोन हजाराचा निधी देत,एक नवीन आदर्श घालून दिला.

अमळनेर येथील सुपरिचित प्लॅटो टेलर्स फर्मचे संचालक चंद्रकांत बिऱ्हाडे यांचा सुपूत्र चि.राहुल याच्या मंगल विवाह सोहळ्यात
चंद्रकांत बिऱ्हाडे व सौ. आशा बिऱ्हाडे यांनी लग्नखर्चातून बचत करून बामसेफ संघटनेला 2000 रूपये जनआंदोलन निधी म्हणून
राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्यप्रभारी प्रा.शिवाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी हिरालाल पाटील (राष्ट्रीय किसान मोर्चा), विश्वास पाटील,(गावरानी जागल्या सेना), अशोक बिऱ्हाडे (गटशिक्षणाधिकारी धरणगाव), श्रीकांत बिऱ्हाडे (अभियंता ,धरणगांव) अनिशा बिऱ्हाडे, वंदना वाल्हे, श्रीकांत वाल्हे, पुष्पा भामरे, अजय भामरे, प्रा.विजय गाढे, मिलिंद निकम, प्रा. जितेश संदानशिव, ए.एम.मोरे, धिरज ब्रम्हे, मनोज बिऱ्हाडे, आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content