चाळीसगावातील पाठक कुटूंबीयांकडून कन्याजन्माचे जल्लोषात स्वागत

chaligaon

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील गणपती होम अप्लायन्सेसचे संचालक तथा प्रथितयश व्यापारी निशांत मुरलीधर पाठक व सरिता पाठक उभयतांना काल दि ५ मे रोजी पहाटे ७ वाजेच्या सुमारास शहरातील पुर्णपात्रे हॉस्पिटलमध्ये जुळे कन्यारत्न प्राप्त झाले. यावेळी पाठक कुटूंबियांच्या वतीने कन्याजन्माचे मोठ्या उत्साहात व थाटामाटात स्वागत करण्यात येवून जल्लोष साजरा करण्यात आला.

 

 

आजही जन्माला येणाऱ्या मुलासोबतच मुलीच्या जन्माचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होत असतांना पाठक कुटुंबियांनी केलेल स्वागत निश्चितच आनंदाची बाब म्हणावी लागेल.जुळ्या मुलींच्या जन्माच्या केलेल्या स्वागतामूळे सौ.सरिता व निशांत पाठक या दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सौ.सरिता यांना देखील जुळी बहिण आहे. मुलीच्या जन्माकडे वेगळ्या दृष्टिकोनातून न पाहता पाठक कुटूंबातील सदस्यांनी नवजात मुलींचे औक्षण करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

 

 

शासन तसेच सामाजिक चळवळीतून मुलींची दिवसेंदिवस घटणारी संख्या पाहता व्यापक स्वरुपाचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत असते. विशेषत: सार्वजनिक सण,उत्सवात पुढाकार घेऊन संदेश देण्यात येतात.अशातच प्रत्यक्षरीत्या कृतीतून मुलींच्या जन्माचे स्वागत करत जल्लोष करण्याचा प्रत्यय सौ.सरिता व निशांत पाठक यांच्या वतीने दिसून आला. यावेळी समाजस्तरावरील अनेकांनी शुभेच्छा प्रदान करीत नवजात कन्यांच्या स्वागताचे कौतूक केले.

 

 

स्त्री-भ्रूणहत्येचे प्रमाण वाढल्याने स्त्री-पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली असतांना आज जूळ्या मुलींच्या जन्माचे करण्यात आलेले स्वागत निश्चितच स्वागतार्ह राहिले. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे, हे लक्षात घेऊन व्यापक विचार रुजविण्यासाठी पाठक कुटुंबियांनी कन्याजन्माच्या स्वागताचा अनोखा संदेश दिला, असल्याचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रदेश संयोजिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी अभिनंदनपत्र संदेशपत्रातून नमूद केले आहे.

Add Comment

Protected Content