वागदरवाडी येथे कर्जाला कंटाळून पिता- पुत्राची आत्महत्या

suside

 

माळाकोळी (वृत्तसंस्था) लोहा तालुक्यातील वागदरवाडी येथे गुरूवारी दुपारी पिता- पुत्राने कर्जाला कंटाळून शेतात असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 

या विषयी अधिक असे की केरबा पांडू केंद्रें (वय 45, रा. वागदरवाडी) व त्यांचा मुलगा शंकर केरबा केंद्रें (वय १७) हे दोघं जण सततच्या नापिकीमुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळलेले होते. याच तणावातून दोघं पिता-पुत्राने गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पिता-पुत्राच्या पाश्चात्य आई, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारख्या योजना, पूरग्रस्तांना अनुदानाचे वाटप केले जात असताना सुद्धा अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा व सततची नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आहेत.

Protected Content