ट्रक-रूग्णवाहिकेचा अपघात; चालक जखमी, ट्रकचालकावर गुन्हा


पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर ते जळगाव रोडवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडके रूग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनाचे नुकसान झाल्याची घटना रविवारी २९ जून रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख अस्लम शेख करीब वय ३५ रा. पहूर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रूग्णवाहिका चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २९ जून रोजी मध्यरात्री हे त्यांची रूग्णवाहिका (एमएच १४ सीएल १२३८) ने पहूर ते जळगाव असाप्रवास करत असतांना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच २६ बीई ०१५७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रूग्णवाहिका चालक शेख अस्लम हा जखमी झाला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ उद्दल चव्हाण हे करीत आहे.