अमळनेरात महाराणा प्रताप जयंतीची जय्यत तयारी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सालाबादप्रमाणे यंदाही २ जून रोजी हिंदूसूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंग यांची जयंती उत्साहात साजरी होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

यादिवशी शहरातील श्री महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी उत्कृष्ठ सजावट करून सायंकाळी 6 वाजता सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते महापूजन करण्यात येणार आहे. तसेच याचवेळी बँड पथकाच्या तालावर मोठा जल्लोष साजरा करून आतिषबाजी करण्यात येणार आहे. यावेळी सर्व राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी पारंपरिक पोशाखात (कुर्ता पायजमा, फेटा परिधान करून सहभागी होणार आहेत. राणाजींची मिरवणूक जागेवरच असली तरी जल्लोष मात्र त्याच थाटात होणार आहे. तरी राणाजींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामिण भागातील सर्व राजपूत समाजबांधव, महाराणा प्रताप प्रेमी आणि विशेष करून महिला भगिनी आणि तरुणांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर तालुका राजपूत समाज पंच मंडळ आणि श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती,अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.

Protected Content