अखेर राज्याला जीएसटीची रक्कम मिळाली !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागू असलेली जीएसटीची रक्कम राज्य सरकारला भेटली असतांना आता यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.

वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम  केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले आहेत. तर, उत्तर प्रदेश ८८७४ कोटी, गुजरात ३३६४ कोटी, तमिळनाडू ९६०२ कोटी, कर्नाटक ८६३३ कोटी, पश्चिम बंगाल ६५९१ कोटी, दिल्ली ८०१२ कोटी, केरळ ५६९३ कोटी थकबाकी दिल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीपोटी एकूण २९ हजार ६०० कोटी रुपये घ्यायचे आहेत. त्यातील १४ हजार १४५ कोटी रुपये मंगळवारी वितरित करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यापर्यंत सर्व राज्यांची नुकसानभरपाईची रक्कम वितरित केल्याचा दावा केला आहे. मात्र गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीच्या वेळी राज्याची जीएसटीची रक्कम केंद्राकडून येणे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करत ही रक्कम मिळण्याची मागणी केली होती. ही महाराष्ट्राला आतापर्यंत एका हप्त्यात मिळालेली सर्वांत मोठी रक्कम आहे, असे वित्त विभागाचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी म्हटले आहे.  तर महाराष्ट्राने उर्वरित रक्कम देखील लवकर देण्याची मागणी केली आहे.

Protected Content