‘केसीई’ विद्यालयात गानकोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘केसीई सोसायटी’ संचलित ‘गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय’ व ‘ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात’ भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शासनाने जाहीर केलेल्या एक दिवसाच्या दुखवट्यामध्ये दोघेही शाळांनी सामील होऊन शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून लता मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी लता दिदीच्या ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे..’या गाण्यातून लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी शाळेच्या पार्यवेक्षिका प्रणिता झांबरे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content