डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दर बुधवारी नाकाची मोफत एन्डोस्कोपी शिबिर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नाकाशी संबंधित असलेल्या विकारांवरील उपचारासाठी मोफत एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाक बंद पडणे, नाकातून वारंवार रक्तस्त्राव होणे, सर्दीमुळे डोके दुखणे किंवा नाकाशी संबंधित कुठलीही समस्या असणाऱ्या गरजू रूग्णांसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागातर्फे आता आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी २ ते ४ यावेळेत मोफत एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या तपासणी शिबिरात दुर्बिणीद्वारे नाकाची नाक-कान-घसा विभाग तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच गरजू रूग्णांना तपासणीनंतर उपचारविषयक सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.

खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी हे शिबिर घेतले जात आहे. या मोफत तपासणी शिबिरात सहभागी होण्यासाठी निवासी डॉ.श्रृती खंडागळे ८२०८९०९४५६ आणि डॉ.हर्षल महाजन ९९२०८५५३५३ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जळगाव भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात ही तपासणी केली जाणार आहे. तरी खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांनी या नि:शुल्क एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content