जनाधार आघाडी राष्ट्रवादीमध्ये विलीन – संतोष चौधरी यांची घोषणा (व्हिडीओ)

bhusawal news 3

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहराचा विकास करण्याची ताकद आहे ते दुसऱ्या पक्षात नाही, आज सत्याचा विजय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जनाधार पार्टीचे विलीन करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज केली.

नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४-अ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर यांचा विजय झाले. त्यावेळी माजी आमदार संतोष चौधरी पत्रकारांशी बोलत होते. सर्वसामान्य मतदार आणि नागरीकांमध्ये विरोधी पक्षाबाबत रोष होता. आज दुर्गेश ठाकूर यांना निवडून आणून रोष व्यक्त केला. शहरातील प्रत्येक वार्डात कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घेतल्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली असल्याचे देखील चौधरी यांनी सांगितले. यावेळी युवा नेते सचिन चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content