सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस दर्शनासाठी बंद

Siddhivinayak

मुंबई प्रतिनिधी । हजारो मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर पुढील आठवड्यात पाच दिवस दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. १५ जानेवारी मकरसंक्रातीपासून ते १९ जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

२५ जानेवारीपासून माघी गणेशोत्सवास सुरूवात होणार आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती महोत्सवाआधी श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येते. मंदिरात मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होतो, याकाळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

Protected Content