‘छपाक’ चित्रपटाच्या यशासाठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

chhapak movie

मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री दीपिका पादुकोन ही ‘छपाक’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. २०२० मधला प्रदर्शित होणारा ‘छपाक’ हा दीपिकाचा पहिला चित्रपट असून आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी दीपिका पदुकोण येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली. दीपिकाने सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवत ‘छपाक’ चित्रपटच्या यशासाठी प्रार्थना केली.

‘छपाक’ सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज (दि.१०) जानेवारीला प्रदर्शित झाला.
याशिवाय आजच अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांचा ‘तानाजी:द अनसंग वॉरीअर’ सिनेमाही प्रदर्शित झाला.

Protected Content