पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शेवट श्रावण सोमवार निमित्त माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून ते जोपासण्याचा संकल्प केला.
नांद्रा येथील अंगणवाडी ताई दरवर्षी सणांना वृक्षारोपण करत साजरा करीत असतात. गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी २१ वडाची झाडे लावून साजरी केली होती. नुसती झाडे लावली नाही तर ती जगवली सुद्धा आज ती झाडे परिसरात डोलाने उभी आहेत. दि. ३० रोजी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून या ताईंनी निंब, पिंपळ, औदुंबर या वृक्षांची लागवड करत लागवड केलेली झाडे जगावी म्हणून त्यांना ट्री गार्ड बसवले.
याप्रसंगी सेविका योगीता गवादे, कल्पना सूर्यवंशी, पुष्पा बाविस्कर, प्रमिला माधव पाटील मदतनीस आशा खरे, संगीता सोनवणे, सुनंदा सूर्यवंशी, बेबाताई पाटील उपस्थित होत्या.