डांभुर्णी येथील प्रभारी सरपंचाला निलंबित करा; महिलेचे आमरण उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांच्या मनमानी कारभाराविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी करून कारवाई केली जात नाही.  त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रतिभा परदेशी या महिलेने आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. 

उपोषणकर्त्या महिला प्रतिभा परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील रहिवाशी असल्याने त्यांच्या ताब्यातील व मालकीची जागेवर अनधिकृपणे प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांनी जागेवर कब्जा केला आहे. याबाबत पाचोरा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली व त्यांनी याचा निवाडा केला होतो. परंतू प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी सदरील जागवेर पत्र लावून ग्रामपंचायतीच्या ताब्यात जमा केली आहे. या जागेवर भोगवटा म्हणून आमचे नाव लावण्यात यावे यासाठी अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली आहे. परंतू त्यांच्या तक्रारीची आणि निवेदनाची कोणतीही दाखल न घेतल्याने जागा मिळावी आणि प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तक्रारदार प्रतिभा परदेशी यांनी आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहे. 

 

Protected Content