पाचोऱ्यात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई ; हातगाड्या जप्त (व्हिडिओ)

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा नगरपरिषदेर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या  हातगाडी, फेरीवाले, टपरीधारक यांच्यावर  मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली  पथकाने कारवाई करत हातगाड्या जप्त केल्यात.  

 

स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे, टपरीधारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनिक रस्त्यातच लावण्यात येत होत्या. यामुळे शहरातील रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, मोठया प्रमाणावर गर्दी जमा होऊन कोविड – १९ महामारी प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढविण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी देखील वारंवार प्राप्त होत होत्या. यावर नियंत्रण मिळावे म्हणून आज शुक्रवार दि. ४ जुन रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली  पथकाने धडक कारवाई अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले यांचे अतिक्रमण काढण्यात आले.  यात हातगाडया जप्त करण्यात आल्यात. काही नागरिकांनी स्वत:हुन त्यांचे नुकसान होऊन नये म्हणून आपले अतिक्रमण काढून घेतले. सदरच्या अतिक्रमणधारकांना रावल जिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळुन जाणारा डी. पी. रोड येथे पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापुढे देखील त्यांनी याच जागेवर आपल्या हातगाडी लावाव्यात. सार्वजनिक रस्त्यावरील हातगाडया लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन हातगाडया जप्त करण्यात येतील.  यावेळी कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले. त्याच प्रमाणे नागरीकांनी शासनाने कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभुमवर ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत  अन्यथा दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा इशारा देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिला.

सदर अतिक्रमण काढते वेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, राहुल मोरे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले कर अधिक्षक दगडु मराठे, लेखापाल दत्तात्रय जाधव, अभियंता (स्थापत्य) मधुकर सुर्यवंशी,सहाय्यक नगर रचनाकार हेमंत क्षिरसागर, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, व ट्रॅफीक विभागाचे पोलिस कर्मचारी प्रकाश पाटील, बापु महाजन, सुनिल पाटील, उपअभियंता (स्थापत्य) हिमांश जैस्वाल, लिपिक प्रकाश शंकर पवार, शाम ढवळे, शामकांत अहिरे, शरद घोडके, चंद्रकांत चौधरी, विजय बाविस्कर, अनिल पाटील, विलास देवकर, पांडुरंग धनगर, विशाल मराठे, फायरमन भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप गायकवाड, सुभाष बागुल, शरद नागणे, युवराज जगताप, नरेश आदीवाल, संदिप जगताप, सुकदेव ठाकुर, भिकन गायकवाड, सचिन जगताप, युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार, मुकादम वाल्मिक गायकवाड, निळकंठ ब्राम्हणे, युसुफ पठाण सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/542893086886460

 

Protected Content