पाचोरा पोलीस ठाण्याला पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट

पाचोरा प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज पाचोरा पोलीस ठाण्याला भेट देवून कामांची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील गुन्हेगारी, भौगोलिक, राजकिय आणि सामाजिक परिस्थीच जाणून घेतली.

यावेळी उपविभागिय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस उपनिरिक्षक दत्ताञय नलावडे, गणेश चौबे, विजया वसावे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधिक्षक डाॅ.प्रविण मुंढे यांनी पाचोरा पोलिस प्रशासनातील कर्मचार्‍यांशी परिचय करून घेतला. तालुक्याची भौगोलिक, सामाजिक व राजकिय परिस्थिती जाणुन घेतली. सध्यास्थितीतील गुन्हेगारी व गुन्ह्यांच्या तपासा बाबतची माहीती जाणुन घेऊन येणार्‍या काळात कामाच्या दिशेत कसा बदल करणे आवशक आहे यावर मार्गदर्शन केले. कर्मचार्‍यांनंतर डाॅ. मुंढे यांनी पञकारांशी सुसंवाद साधला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सध्या संपुर्ण जिल्ह्याचा दौरा सुरू असुन यातुन प्रत्येक ठिकाणची माहीती जाणुन घेण्याचे काम सुरू आहे.प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाच्या समस्या असुन यावर वरिष्ठ पातळिवरून योग्य ते उपाययोजना करण्यात येतिल. गुन्ह्याचा तपास हा व्यवसायिक पध्दतिने झाल्यास त्यात तांञिक तृट्या राहत नाही व तक्रारदाराला न्याय दिला जातो. पोलिस प्रशासनाने अवैद्य व्यवसायावर वकच बसवुन गावासह तालुक्यात खाकीचा वचक बसविणे गरजेचा असुन येणार्‍या काळात तशी पाऊले उचलली जातील असेही यावेळी डॉ. प्रविण मुंढे यांनी आस्वासित केले.

Protected Content