पत्रकार संतोष शेलोडे यांची लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत

जळगाव प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे भुसावळ येथील प्रतिनिधी संतोष शेलोडे यांनी लॉकडाऊनमध्ये गरजूंना अन्नदानासह विविध प्रकारची मदत केली असून याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. कोरोनाच्या आपत्तीत हा स्तंभ अतिशय कर्तव्यदक्षतेने आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाबतची सर्वांगीण माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. याचमुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना वॉरियर्समध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने आमचे भुसावळचे प्रतिनिधी संतोष शेलोडे यांनी आजवर अतिशय तडफेने वार्तांकन केले आहे. यात कोरोनाशी संंबंधीत सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी चोखपणे पार पाडले आहे. यात त्यांनी अनेकदा विविध व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून नागरिकांना त्या-त्या घटनांना आपल्या स्मार्टफोनवरून पाहण्याची संधी देखील उपलब्ध करून दिलेली आहे.

दरम्यान, पत्रकार म्हणून वार्तांकन करत असतांना संतोष शेलोडे यांनी आपल्यातील संवेदनशीलता देखील जपली आहे. या अनुषंगाने वार्तांकनासाठी फिरतांना रस्त्याने कुणी गरजू दिसला तर त्याला हवी ती मदत करण्याचे काम त्यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच प्रारंभ केले असून यात अद्यापही खंड पडलेला नाही. रस्त्यावरून पायी गावाकडे निघालेल्यांना भोजन, पाणी आदींसह त्यांना घरी पोहचण्यासाठीचे मार्गदर्शन करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मदतीने अनेकांना मदत मिळालेली आहे. संत गाडगेबाबत शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देश्यीय संस्थेच्या माध्यमातून त्यांचे हे सेवाकार्य अव्याहतपणे सुरू आहे. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून संतोष शेलोडे यांनी केलेली समाजसेवा ही अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content