माळी समाज मंडळातर्फे महात्मा जोतीराव फुलेंना अभिवादन

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या २८ नोव्हेंबर स्मृतीदिनानिमित्त माळी समाज मंडळाच्या वतीने प्रथम अभिवादन कार्यक्रम आरोग्य सेवक विकास माळी यांच्या निवासस्थानी दत्त कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी केंद्र प्रमुख शामराव महाजन हे होते. माल्यार्पण व प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम माजी शिक्षक रावण वानखेडे व शामराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर मनोगत सादर करतांना प्रमुख पाहुणे सी. ए. समाधान माळी (मुंबई), क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच अमळनेरचे अध्यक्ष प्रविण महाजन, सुनिल महाजन, कृषी अधिकारी प्रदीप माळी, एम. एम. महाविद्यालयाचे संतोष महाजन, विजय महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांनी शाहीरी च्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या जीवन चरीत्रावर उजाळा टाकला.

तसेच अध्यक्षीय भाषण शामराव महाजन यांचे सह वक्त्यांनी मनोगत सादर केले. कार्यक्रमाला माळी समाज बांधव राजेंद्र बोरसे, गुलाबराव महाजन, अनिल महाजन, कालीदास पाटील, अनिल महाजन (मोहाडी), रमेश महाजन, अशोक पाटील, आनंदा महाजन, घनश्याम महाजन, विकास माळी, राहुल महाजन इत्यादी माळी समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन गुलाबराव महाजन तर उपस्थितांचे आभार विकास माळी यांनी मानले.

Protected Content