भुसावळ-प्रतिनिधी | शहरातील गंगाराम प्लॉट भागातील प्रौढ इसमाने स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागे रहिवासी असलेले डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवली होती. . पोलीस निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.