सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ख्यातनाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश सुनील पाटील यांना जाणीव सांस्कृतीक अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
या संदर्भातील वृत्त असे की, नाशिक येथील जाणीव सांस्कृतीक अभियान या संस्थेच्या वतीने जळगाव येथील भव्य कार्यक्रमात विविध मान्यवरांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यात सावदा येथील ओम कोल्ड स्टोअरेजचे संस्थापक ऋषीकेश सुनील पाटील यांना देखील गौरवपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात इतिहासाचार्या प्रा. स्मिताताई देशमुख, मुंबई येथील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक रत्नाकर बळीराम चौधरी व बोईसर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे आदींसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ऋषीकेश पाटील यांचा गौरव करण्यात आला.