अल्प भूधारक शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल : परिसरात हळहळ

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकर्‍यांने धाकटेगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील अल्पभूधारक शेतकरी योगेश भास्कर वाघे (वय – ४२) हे शेती करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. २० जुन रोजी नेहमीप्रमाणे शेताचे काम करण्यासाठी ते शेतात गेले होते. दरम्यान सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धाकटेगाव शिवारातील शेत गट क्रं. १२२४ मधील झाडाला योगेश वाघे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह ग्रामस्थांना आढळुन आला. ग्रामस्थांच्या मदतीने योगेश वाघे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी योगेश वाघे यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे. मयत योगेश वाघे यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अतिशय मेहनती व शांत स्वभावाचे योगेश वाघे यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content