गांजाचा नशा करणाऱ्या एकावर कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई केल्याची घटना बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात शेख अन्वर शेख अकबर (वय-३२) रा. आगाखान वाडा, भुसावळ हा बेकायदेशीर गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गांजाचा नशा करणाऱ्या शेख अन्वर याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख अन्वर शेख अकबर याच्या विरोधात रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content