यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ते डोंगरदे या मार्गावरील रस्त्यावर सकाळी गस्ती पथक गस्त करत होते. यादरम्यान त्यांना एक बिना क्रमांकाची लाल रंगाची बजाज कायनाटीक मोटारसायकलवर एक संशयित व्यक्ती अवैध डिंक घेऊन जाताना दिसून आला. परंतू वनविभागाचे शासकीय वाहन बघून तो मोटरसायकल फेकून पसार झाला. या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही, तरी वन गुन्हा क्रमांक ५ /२०२४ २३ मार्च २०२४ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी व गस्ती पथक यावल यांनी जारी केला. तरीसुध्दा आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही.
वन विभागाने धावडा डिंक ३४ किलो ७१४० रुपये इतकी किमंत आहे. तसेच एक दुचाकी मोटर सायकलची किंमत बाजारभावा प्रमाणे १७ हजार रुपये इतकी असुन वन विभागाच्या कार्यवाहीत जप्त वाहनासह मालाची किंमत सुमारे २५ हजार रुपये इतकी आहे. सदरची कार्यवाहीत आनंदा पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी गस्ती पथक यावल, आर.एम.जाधव वनपाल, रमेश थोरात वनपाल, पोकॉ सचिन तडवी, वाहन चालक आनंद तेली यांचा सहभाग होता.
सदरची ही कार्यवाही ही जमीर शेख उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव, राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी (दक्षता पथक) धुळे, प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.