आघाडीत बिघाडी; प्रकाश आंबेडकर यांची ठाकरेंसोबतची युती तुटली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहूजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची अखेर आघाडी तुटली आहे. उध्दव ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती तुटली आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकराच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे अशी चर्चा सुरू आहे.

२३ मार्च रोजी आज प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणत होते की, कोडी टाकण्याचं काम सुरू आहे. वस्तुस्थिती दाखवली जात नाही. त्यांचे झाकलेले कोंबडं आता बांग देऊ लागलं आहे. त्यांचेच भांडण संपत नाहीये. त्यांचाच तिढा सुटत नाहीये. मग आमची एन्ट्री करून काय करायचं? आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार आहोत. आम्ही त्यांना सात जागा सांगितल्या आहेत. आम्ही पूर्ण थांबलोय असं नाही.

आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिलं आहे. नाना पटोले यांनाही दिलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचं सात जागांवर एकमत झालं तर बरं होईल. आम्ही नंतर निर्णय घेऊ. आम्हाला जे कळवायचे ते आम्ही मतदारांना कळवलं आहे. महाविकास आघाडीचं काय होतं ते आम्ही पाहू. त्यानंतर 26 तारखेला आमची भूमिका स्पष्ट करू. यादरम्यान आंबेडकरांनी महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शाहू महाराजांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी जवळची आहे. त्यामुळे आम्ही शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. असे आंबेडकर म्हणाले.

Protected Content