गुजरातमधील भाजपच्या दोन खासदारांची निवडणूकीतून माघार

वडोदरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मोठी बातमी आली आहे. गुजरातमधील दोन भाजप खासदारांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास ही निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. हे भाजप खासदार वडोदराच्या रंजनबेन भट्ट आणि सांबरकाठाच्या भिखाजी ठाकोर आहे. रंजनबेन भट्ट यांना भाजपने वडोदरा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण सोशल मीडीयावर वैयक्तिक कारणामूळे त्यांनी माघार घेतली आहे. वडोदरा लोकसभा जागेसाठी तिसऱ्यांदा रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाली.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा अशा दोन ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. दोन्ही मतदार संघातून ते विजयी झाले होते. मात्र, त्यांनी वडोदराची जागा सोडली. त्यामुळे येथे झालेल्या पोटनिवडणूक झाली. यात भाजपच्या भट्ट यांनी विजय मिळविला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. आता २०२४ च्या निवडणुकीतही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला. भाजपच्या राष्ट्रीय महिला विंगच्या उपाध्यक्षा ज्योतिबेन पंड्या यांनी पक्षाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तसेच, रंजनबेन भट्ट यांच्या नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते.  दुसरा नाव आहे भिखाजी ठाकोर याचं. ठाकोर यांना साबरकांठामधून भाजपने उमेदवारी दिली होती. त्यांनीही सोशल मीडीयाव्दारे वैयक्तिक कारणांचा हवाला देत निवडणूकीतून माघार घेतली.

 

Protected Content