ट्रकच्या धडकेत महावितरण ट्रान्सफार्मरचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील कृष्णा पेटींग कंपनीसमोर भरधाव ट्रकने महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरला जोरदार धडक दिल्याने ट्रान्सफार्मरचे नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील डी-सेक्टरमध्ये कृष्णा पेंटींग कंपनीसमोरील २०० केव्हीए ट्रान्सफार्मरला ट्रक (एमएच १९ झेड ४१३६) वरील चालक गजानन रमेश चौधरी याने भरधाव ट्रकवरील ताबा सुटल्याने जोरदार धडक दिली. यात २०० केव्हीए ट्रान्सफार्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व ट्रान्सफार्मरमधील संपुर्ण आईल रस्त्यावर पडले होते. ही घटना घडताच कंपनीच्या मालकाने फोनवरून ट्रकच्या धडकेत ट्रान्सफार्मरचे नुकसान केल्याचे महावितरण कार्यालयात सांगितले. दरम्यान, महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता ट्रक जागेवर आढळून आला नाही. सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे, कर्मचारी राजु चौधरी आणि पंकज सोनवणे यांनी शोधाशोध केली. सदरील ट्रक हा शांती पल्स कंपनीच्या आवारात माल खाली करत असल्याचे दिसून आला. महावितरणने झालेल्या नुकसानीबद्दल बोलले असता ट्रक मालक याने तुम्हाला पटेल ते करा तो नुकसान भरण्यास तयार नसल्याचे सांगितले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content