शाळेत न पाठवल्याच्या रागातून मुलीची आत्महत्या

2014 12 22 boysuicide ns

धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील सोनवद येथील इ.९ वीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय शाळकरी मुलीने शाळेत जाऊ न देता कुटुंबीय शेतात पाठवतात याचा राग आल्याने राहत्या घरीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.  पुजा संतोष परदेशी (वय १६) असे मयत मुलीचे नाव असून तिच्या वडिलांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे.

घरात अठराविश्व दारीद्रय असल्याने मोल मजूरी करुन परिवाराला मुलीःचा हातभार लागेल या हेतूने पूजा हिला शेतात पाठवीत होते.  यामुळे तिची शाळा बुडत होती. सध्या कपाशी वेचण्याचे  काम जोमाने सुरु असून मजूर मिळत नाही. त्यामुळे दोन पैसा घरात यावा या उद्देशाने तिला घरच्यांनी काही दिवस शेतात जा असे सांगितल्याने तिला शाळा बुडत असल्याने राग आला व संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.  मयत पुजाच्या पश्चात आई, वडील,व चार बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून उर्वरित चौघी अविवाहीत होत्या. पुजाला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. उद्या सकाळी शवविच्छेदनानंतर तिच्यावर सोनवाद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या घटनेसंदर्भात धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि पवन देसले हे करीत आहे.

Protected Content