ओरियन्ट सीबीएसई शाळेने राबविला ‘फुड बँक’ उपक्रम

CBSE 1

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचलित ओरियन्ट सीबीएसई स्कूलतर्फे संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यातून आनंद हा उपक्रम राबविण्यात आला. आजच्या पिढीतील मुलांमध्ये संकुचित वृत्ती बऱ्याच प्रमाणात दिसून येते. अशा या पिढीला देण्यातून आनंद कसा अनुभवावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व मिळून दहा क्विंटल धान्य व बेसन पीठ ‘फूड बँक”च्या कल्पनेतून जमा केले. या धान्याचे वाटप चोपडा तालुक्यातील उनपदेव जवळील पाड्यांवर आदिवासी बांधवांना करण्यात आले. प्रत्येकी एक किलो ज्वारी, एक किलो बेसन पीठ तसेच त्यांच्या मुलांना पुस्तके, पेन्सिल, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी या गरजू मुलांच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य पाहून विद्यार्थ्यांना देण्याचे महत्त्व कळून आले.या उपक्रमाचे आयोजन ‘सेवारत’ संस्थेच्या मार्फत शाळेने संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची, संस्थेचे शाळा समन्वयक के.जी.फेगडे, उपप्राचार्य माधवी सिट्रा, शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या वतीने डॉ.शमा फेगडे तसेच शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content