वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात सोमवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई केली असून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता थेट गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी रस्त्यावर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी आल्याचे पाहून काही वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक पसार झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आव्हाणे भागात सुरू असलेल्या बायपासच्या रस्त्याकडून थेट गिरणा नदीत उतरले.

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात देखील रात्रभर गिरणा नदीपात्रात तपासणी केली होती. मात्र, त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी दौऱ्याची माहिती वाळू माफियांना आधीच मिळाल्यामुळे वाळू माफिया पसार झाले होते. सोमवारी २ जानेवारी रोजी सकाळी देखील जिल्हाधिकारी गिरणा नदीपात्राकडे गेले असता, धरणगाव तालुक्याच्या हद्दीतून अनेक वाहनं पसार झाले होते.

Protected Content