चिंचोली येथील रेशनदुकानदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य विक्री व धान्य कमी देणाऱ्या चिंचोली येथील रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल होता. जिल्हा न्यायालयाने रेशनदुकानदाराने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव ११ एप्रिल रोजी तपासणीसाठी चिंचोली येथे गेले होते. येथील चिंचोली येथील रेशनदुकानदार संजय शालीग्राम घुगे यांच्या रेशन दुकानाची तपासणी करत असतांना, त्यांना घुगे यांनी लाभार्थ्यांना देय प्रमाणापेक्षा कमी धान्य दिले, तसेच शासनाने निर्धारीत केलेल्या दरापेक्षा जास्तीच्या दराने धान्य दिल्याचे समोर आले होते. याप्रकरणी डिगंबर जाधव यांच्या फिर्यादीवरुन १४ एप्रिल २०२० रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित घुगे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी जिल्हा न्यायालयात न्या.एस.जी.ठुबे हा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

Protected Content