खळबळजनक : धार्मिक कार्यक्रमात महिनाभर अडकून पडलेले ७९५ भाविक करोना पॉझिटिव्ह

नांदेड (वृत्तसंस्था) एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. पंजाब सरकारने ८० ट्रॅव्हल्सच्या मदतीने या ४ हजार नागरिकांना परत नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात तब्बल ७९५ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली आहे.

 

एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आले. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल ७९५ जण करोनाग्रस्त निघाले आहेत. यामुळे पंजाब सरकारसह नांदेडमध्ये देखील खळबळ उडाली आहे. हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्यानंतर ४० दिवसापासून हे भाविक मुक्कामाला होते. दरम्यान, पंजाबमधील रुग्णांची १२३२ वर पोहोचली आहे.

Protected Content