Home आरोग्य मृत महिलेसह आप्तांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

मृत महिलेसह आप्तांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

0
41

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । हिंगोणा येथील कोरोना सदृश्य व्याधीने मृत पावलेली महिला आणि तिच्या कुटुंबियांच्या स्वॅब सँपल्सचा अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे.

याबाबत वृत्त असे की, मूळची यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी असणारी महिला येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मरण पावली होती. या महिलेस कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या महिलेचे स्वॅब सँपल घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच या महिलेच्या कुटुंबियांचेही सँपल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. काल रात्री हे सर्वच्या सर्व म्हणजे चारही अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्‍वास सोडला आहे.


Protected Content

Play sound