कोरोनाबाधीतांच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येतील कोरोना बाधीत दोन रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांच्या स्वॅब सँपलचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने या दोन्हींच्या संपर्कातील सहा जणांचे स्वॅब सँपल हे तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे रिपोर्ट रात्री उशीरा निगेटीव्ह आले. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

Protected Content