सत्तेची वाट पाहणाऱ्या राऊत यांना वेड लागलेय : रावसाहेब दानवे

5ec066dd5e1c934586ff26770306419b

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांना काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांना आताही समजत नाही. सत्तेची वाट पाहणाऱ्या राऊत यांना वेड लागले आहे. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना लवकरच वेड्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करावे लागेल असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी वारंवार भाजपावर निशाणा साधला मात्र त्यांना वेड लागले आहे. संजय राऊत यांनी सांगितले की भाजपाच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागले आहे. मात्र माझे हे म्हणणे आहे की, संजय राऊत यांनाच वेड लागले आहे. त्यांना कुठल्यातरी वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.

Protected Content