शिवाजीनगरातील गोडावूनला आग; सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल जळून खाक

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर येथील आयुक्तांच्या बंगल्याशेजारी असलेल्या सिगारेटसह खाद्यपदार्थांच्या गोडावूनला अचानक लागलेल्या आगती सुमारे ५२ लाखांचा रूपयांचे नुकसान झाले आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी की, अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू वय ४६ रा.  जैन पाईप फॅक्टरी, निमखेडी रोड यांची शिवाजीनगर येथील महापालिका आयुक्त यांच्या बंगल्या शेजारी गोडावून आहे. या गोडावूनमध्ये ते सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल ठेवतात. या गोडावूनला १५ मे रोजी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीबाबत याच परिसरात राहत असलेल्या अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू यांच्या बहिणी निर्मला हिस माहिती मिळाली. तिने आगीच्या घटनेबाबत भाऊ अरुणकुमार जाजू यास फोनवरुन कळविले. अरुणकुमार जाजू घटनास्थळी पोहचले असात, आगीत गोडावूनमधील ४२ लाखांच्या सिगारेट व १० लाखांचे बिस्कीटसह इतर खाद्यपदार्थ असा एकूण ५२ लाखांचा माल खाक झाला आहे. याप्रकरणी अरुणकुमार जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रहिवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्या अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content