चैतन्य तांडा येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चाळीसगाव, प्रतिनिधी  ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैतन्य तांडा व पोलिस प्रशासनातर्फे गेल्या काही दिवसांपासून विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे सुरूच असून धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर आज पुन्हा ११ जणांवर कारवाई करण्यात आली. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ग्रामीण भागात अक्षरशा धैमान घातले आहे. त्यात मृत्यूच्या दरात हि लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे कोरोनाविषयक जनजागृती करून त्याला आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यातील चैतन्य तांडाने ग्रामीण पोलीसांच्या मदतीने काही दिवसांपासून विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर आज पुन्हा कारवाई करण्यात आली असून १ जूनपर्यंत हि कारवाई असीच सुरू राहणार आहे. यावेळी एकूण ११ जणांवर कारवाई करून  ११०० रूपये वसूली करण्यात आली. प्रत्येक विना मास्क फिरणाऱ्यास १०० रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. आज १६ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास विराम लॉन्स समोर हि कारवाई करण्यात आली. चैतन्य तांडाने अद्यापपर्यंत केलेल्या कारवाईतून ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर चैतन्य तांडाने केलेल्या कारवाईतून मध्यंतरी ५० टक्के रक्कम हि ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सुपूर्द करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान हवा देवीदास पाटील, सुनील निकम सूर्यवंशी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंद राठोड, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड व ग्रामसेवक कैलास जाधव आदी उपस्थित होते.

Protected Content