चिखली उपजिल्हा रूग्णालयातील कोवीड सेंटरची पालकमंत्र्यांकडून पाहणी

बुलडाणा प्रतिनिधी । चिखली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील उपजिल्हा रूग्णालयात शासकीय कोवीड रूग्णालय सुरू करण्यात येत आहे. शासकीय कोवीड सेंटरची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भेट घेवून कामांची पाहणी केली.

चिखली शहरातील कोरोना रुग्णाची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी डीसीएचसी अंतर्गत ५० खाटाचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.  आगामी 6 दिवसांमध्ये काम पूर्ण करावे, असे सक्त आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी आमदार श्वेता महाले, राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष रवी तोडकर, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे, डॉ.खान मॅडम, पत्रकार कैलास शर्मा , चिखली अर्बनचे संचालक शैलेश बाहेती, एकता अर्बनचे अध्यक्ष शे.अनिस शे. बुढन आदी मान्यवर होते.

Protected Content