प्रादेशिक पर्यटन अंतर्गत पायाभूत सुविधा विकास  

 जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात पर्यटन स्थळे विकास अंतर्गत पायाभूत सुविधासाठी प्रादेशिक पर्यटनद्वारा विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात विकास कामांसाठी जिल्हा प्रशासनाला शासनस्तरावरून 12 कोटी 29 लाख 97 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे अनेक विकास कामांना निधी नसल्यामुळे अडथळे येत होते. यावर्षी २०२१-२२ अंतर्गत पर्यटनस्थळे पायाभूत सुविधासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतर्गत राज्य शासन वित्त विभागाकडून 40 कोटी 86 लाख 98 हजार रुपये निधी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा नियोजन विभाग प्रशासनाला शासनस्तरावरून 12 कोटी 29 लाख 97 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कानळदा कण्वमुनीं मंदिर आश्रम परिसर १.५० लाख, कण्वमुनीं आश्रम ते कानळदा ग्रा. प. रस्ता बांधकाम १.९९.५० हजार, गारखेडा ता. जामनेर येथे वाघुर धरण पाणलोट क्षेत्रात व्हिला कॉटेज बांधकाम १,५० लाख, हाउसबोट १,५० लाख, ऐतिहासिक श्रीराम मंदिर पर्यटक निवारा १,४५ लाख, रामेश्वर महादेव मंदिर पळसोद, श्रीक्षेत्र गणपती मंदिर परिसर तरसोद, उनपदेव परिसर प्रत्येकी १,५० लाख, नशिराबाद झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर परिसर ६५ लाख, बंद्रीनाथ मंदिर बहादरपूर पारोळा १ कोटी असे १२ कोटी २९ लाख ९७ हजार रुपये निधी जिल्हा नियोजन विभाग अंतर्गत प्राप्त झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हि विकास कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली.

Protected Content