रावेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित चौघा महिलांचा मृत्यू

रावेर, प्रतिनिधी ।  रावेर ग्रामीण रुग्णालयात मागील २४ तासात चार महिलांचा कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झाला आहे.यामुळे काळजी आणि खबरदारी घेण्याचे अवाहन करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुक्याला भेट देण्याची मागणी नागरिकांमधून  होत आहे.

दि १५ रोजी रावेर ग्रामीण रुग्णालयात मागील २४ तासात चार महिलांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.  कोचुर येथील ६७ वर्षीय,  वाघोदा येथील ६५ वर्षीय,  ऐनपुर येथील ६३ वर्षीय तर रावेर येथील ६६ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.  आज सकाळी सकाळी पुन्हा ऐनपुर येथील एका महिलेला रावेर ग्रामीण रुग्णालयात  मृत अवस्थेत आणाले. सद्या २६ पेशंट ग्रामीण रग्णालयात  असून २८ पेशंट कोरोना सेंटरमध्ये आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन सांगतात रावेर ग्रामीण रग्णालयात आलेले पेशंटला लास्टस्टेपला उपचारसाठी येथे आणतात. आधी ४० च्यावर पेशंट येथे होते आज २५ च्या जवळ आहे .तालुक्यात रिकव्हरी रेट सुध्दा ८५ टक्केच्यावर असून ही आशादायक बातमी आहे. जनतेने देखिल काही लक्षणे जाणवताच ताबतोड टेस्ट करून उपचारासाठी येथे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

प्रशासकीय टीमला सलाम 

कोरोना विषाणू सारखी महामारी सर्वत्र हाहाकार माजवत असतांना तालुक्यात रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी रावेर शहरात  मुख्यधिकारी रविंद्र लांडे  शहरात सतत फिरून काम करताय. तर रावेर  ग्रामीण भागातमध्ये गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल या सतत फिरून प्रतिबंधक क्षेत्रात भेटी देताय. गर्दी होऊ नये म्हणून पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे लक्ष ठेवून आहेत. विना मास्क  फिरणा-यांना दंड करताय वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन, डॉ. शिवराय पाटील देखिल शासनाचे  आदेशानुसार  रुग्ण सेवा बजावत आहे. या सर्वांच्या कामकरण्याच्या पध्दतीमुळे तालुक्यात रिकव्हरी रेट ८५ टक्केच्या वर आहे.

जिल्हाधिका-यांनी रावेर दौरा करावा 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुका दौरा करण्याची भावना सुज्ञ नागरीकांमधुन होत आहे.कोरोना संदर्भात उपाय-योजनाची प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी तसेच रावेर पुरवठा विभाग खुप जिल्हाभर गाजतोय त्यामुळे या सर्व गोष्टीच्यावॉश आऊटसाठी रावेर दौरा करण्याची मागणी होत आहे.

 

Protected Content