सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिरोदा येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवारी २४ जुलै रोजी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहे.

Protected Content