धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरूणीला लग्नाचे लावण्याचे खोटे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २६ मे रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. एप्रिल २०२२ मध्ये संशयित आरोपी संदीप संजय धनगर रा.धरणगाव याने पिडीत तरूणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर खोटे लग्न लावून समाजासमोर कायदेशीर लग्न लावण्याचे खोटे आमिष देवून वेळोवळी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणीने मुलाला जन्म दिली, त्यानंतर पिडीत तरूणीने कायदेशीर लग्न लावण्याबाबत विचारणा केली असताना संशयित आरोपी संदीप धनगर याने शिवीगाळ व माारहाण करून धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी तरूणीने सोमवारी २६ मे रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संदीप संजय धनगर (कंखेर) रा. धरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.