जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून एरंडोल येथील तरूणीवर जळगावातील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील रहिवाशी असलेली २३ वर्षीय तरूणी ही सध्या एरंडोल शहरात वास्तव्याला आहे. पिडीत तरूणीची ओळख विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे वय २७ रा. बरेजवळा ता. खामगाव जि.बुलढाणा याच्याशी ऑगस्ट २०२४ मध्ये झाली. विश्वजीत सिसोदे याने पिडीत तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव एमआयडीसीतील एका नामांकित हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोबत काढलेले व्हिडीओ आणि चॅटींग पिडीत तरूणीच्या आईवडीलांना दाखविण्याची भिती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच पिडीत तरूणीच्या वडिलांना व्हॉटसॲपवरून वारंवार जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी पिडीत तरूणीने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.