वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील देशमुख पेट्रोल पंप परिसरात धारदार चाकू घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीवर वरणगाव पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ इंच लांबीचा धारदार चाकू जप्त केला आहे. याप्रकरणी सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील देशमुख पेट्रोल पंप परिसरात संशयित आरोपी गणेश निवृत्ती भंगाळे वय ३६ रा. गांधी चौक वरणगाव हा हातात धारदार चाकू घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ खंडेराव यांना मिळाली. त्यांनी याबाबत पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवारी २६ मे रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी गणेश भंगाळे याला अटक केली. त्यांच्याकडून धारदार लोखंडी चाकू जप्त केला आहे. याबाबत सोमवारी रात्री १० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहे.